प्रयागराज (वृत्तसंस्था): पंतप्रधान मोदींनी महाकुंभाच्या समारोपावर एक ब्लॉग लिहिला आहे. शीर्षक आहे -‘ एकतेचा महाकुंभ – युग परिवर्तनाची चाहुल’. त्यांनी लिहिले आहे की, – एकतेचा महान यज्ञ पूर्ण झाला. एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणे सोपे नव्हते.
मी गंगा, यमुना आणि सरस्वती मातेला प्रार्थना करतो की जर आमच्या उपासनेत काही कमतरता असेल तर कृपया आम्हाला क्षमा करा. जर आम्ही भक्तांची सेवा करण्यात कमी पडलो असलो तर मी जनतेकडून क्षमा मागतो. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केले.
ते म्हणाले, त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार, प्रशासन आणि जनतेने एकत्रितपणे एकतेचा हा महान कुंभ यशस्वी केला. केंद्र असो वा राज्य, कोणीही शासक किंवा प्रशासक नव्हता, प्रत्येकजण भक्तीने भरलेला सेवक होता.