उबाठा शिवसेनेबाबत शिवसेनेकडून गौप्यस्फोट
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अर्थात कोस्टल रोडवरील (Coastal Road) पॅचवर्कच्या कामांबाबत अपप्रचार करत असल्याने शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेने आता उबाठा शिवसेनेलाच सवाल करत सतत ‘मलिदा’ खाण्याच्या आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्या पक्षातील अर्थात उबाठा शिवसेनेने पदाधिकाऱ्यांकडे पाहावे. सध्याचे उबाठा शिवसेनेचे किती पदाधिकारी हे या कोस्टल रोड प्रकल्पासाठी कच्चा माल पुरवणारे ठेकेदार होते असा सवाल करत शिवसेनेने सर्व कच्चा माल पुरवठादारांची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमेय घोले यांनी एक्स वर पोस्ट करत उबाठा शिवसेनेचे कपडेच काढत ही मागणी केली आहे, घोले यांनी हाजी अली ते वरळीपर्यंतच्या कोस्टल रोडच्या पॅचवर्कबाबत अपप्रचार करणाऱ्यांचा समाचार घेत असे म्हटले आहे की, या प्रकल्पाचा टेंडर आणि कंत्राट २०१६-२०१७ मध्येच दिला गेला होता, आणि प्रत्यक्ष काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर आणि रखडलेल्या प्रकल्पाबाबत ‘सध्याच्या सरकार’ ला दोष देणे म्हणजे आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याचा हास्यास्पद प्रयत्न आहे.
Mumbai Nashik Expressway : मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट पुढील ६ दिवस दोन टप्प्यात राहणार बंद
सतत ‘मलिदा’ खाण्याच्या आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्या पक्षातील उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे पहावे. सध्याचे किती उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी हे या कोस्टल रोड प्रकल्पासाठी कच्चा माल पुरवणारे ठेकेदार होते, यावर एक सखोल चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले. का तुमच्याच पक्षाचे विद्यमान उबाठा शिवसेनेचे सचिव थेट कंत्राटदारांशी बोलून ‘सब-कॉन्ट्रॅक्ट’ देण्याबाबत दबाव आणत होते, त्यामागचे सत्य काय आहे, यावर सुद्धा एक सखोल चौकशी व्हायला हवी, असाही गौप्यस्फोट करत गंभीर प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यामुळे हाजी अली कोस्टल रोड प्रकल्पातील सर्व कच्चा माल पुरवठादारांची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी घोले यांनी केली असून राजकीय आरोप करण्याऐवजी, पारदर्शकतेसाठी, लोकांना खरी माहिती मिळावी आणि कोणीही जनतेच्या पैशांचा गैरवापर करून सुटू नये, हीच आमची भूमिका आहे. आम्ही विकासाच्या मार्गावर प्रामाणिकपणे पुढे चाललो आहोत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सदैव तयार आहोत. वेळप्रसंगी, संबंधित यंत्रणांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही आम्ही करू असाही गर्भित इशारा घोले यांनी दिला आहे.