Disha Salian death case : आदित्य ठाकरेंची दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अटक माझ्यामुळे टळली!

  248

आता कोणत्याही क्षणी होणार आदित्य ठाकरेंना अटक; ठाकरे गटातील माजी नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ


मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) अटक होऊ नये म्हणून मी त्यावेळी माझ्या सर्व स्रोतांचा वापर केला होता. त्यामुळेच आदित्य ठाकरेंची अटक टळली, अन्यथा त्यांना आधीच अटक झाली असती, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे माजी नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


किशोर तिवारी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत सांगितले की, "पंतप्रधान मोदींना जेव्हा वाटेल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल." तसेच, आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असताना दिशा सालियन हिच्या घरी जाऊन पार्टी केल्याचा आणि त्यानंतर दिशा सालियनने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तिवारी यांनी केला आहे.



तिवारी यांनी पुढे सांगितले की, आदित्य ठाकरेंची अटक होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या सर्व स्रोतांचा वापर केला होता. त्यामुळेच त्यांची अटक टळली. तिवारी हे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.



दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केल्यापासून या प्रकरणावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. काहींनी तिच्या आत्महत्येमागे कट असल्याचा आरोप केला होता. आता किशोर तिवारी यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे