GBS : जीबीएसचा वाढता धोका! नागपुरात तिसरा तर सांगलीत पहिला बळी

नागपूर : गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) या आजाराचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एकीकडे पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढत असतानाच आता राज्यातील विविध भागांमध्येही या आजाराचा प्रभाव पाहायला मिळत आहे. पुणे कोल्हापूरनंतर आता नागपूरमध्ये जीबीएसचा तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. (GBS)



मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या नागपूरच्या जीएमसी रुग्णालयात एक लहान मूल आणि दोन प्रौढ रुग्ण उपचार घेत आहेत. या वर्षातील जीबीएसमुळे मेडिकलमधील हा तिसरा मृत्यू आहे. मृत रुग्ण हा मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृती अचानक खालावल्याने त्याला काही दिवसांपूर्वी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाही त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.


त्याचबरोबर दुसरीकडे, सांगली शासकीय रुग्णालय सांगली येथे ३६ वर्षे तरुणाचा जी बी एस या आजाराने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण असून आहे.  हा ३६ वर्षीय युवक खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता त्यानंतर शासकीय रुग्णालय सांगली येथे उपचार घेत असताना आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील हा रुग्ण असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. (GBS)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि