Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीRanveer Allahbadia : सुप्रीम कोर्टाचे अलाहबादियाला अटकेपासून संरक्षण

Ranveer Allahbadia : सुप्रीम कोर्टाचे अलाहबादियाला अटकेपासून संरक्षण

पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज, मंगळवारी युट्यूबर रणवीर अलाहबादियाला खडसावले. त्‍याला अटकेपासून संरक्षण देत पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचा आदेशही सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलाय.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात रणवीर याने अत्‍यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर चौफेर टीका झाल्‍यानंतर हा कार्यक्रम यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. अलाहबादिया याने माफीही मागितली आहे. त्‍याच्‍याविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्‍हे दाखल झाले आहेत. याविरोधात त्‍याने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटेश्वर सिंह म्हणाले की, त्याच्या मनात घाण आहे, ती यूट्यूब शोमध्ये उधळली गेली. समाजाची मूल्ये कोणती आहेत ?’ त्‍याची तुम्हाला माहिती आहे का ? असे प्रश्न उपस्थित करत ‘समाजात काही स्वयं-विकसित मूल्ये असतात. तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे असेही न्‍यायालयाने बजावले. तुम्ही वापरलेल्या शब्दांमुळे पालकांना लाज वाटली. बहिणी आणि मुलींना लाज वाटेल, संपूर्ण समाजाला लाज वाटेल. यावरून असे दिसून येते की तुमचे मन विकृत आहे.

Minister Nitesh Rane : सिंधुदुर्गात लवकरच सुरू करणार ‘पालकमंत्री कक्ष’- मंत्री नितेश राणे

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही समाजाच्या नियमांविरुद्ध काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य नसल्याचेही सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा देतानाच सध्या इतर कोणताही कार्यक्रम करता येणार नाही. ठाणे पोलिसांकडे पासपोर्ट जमा करावा, असा आदेशही दिला. इलाहाबादिया तपासाला सहकार्य केले तर अटक करू नये. त्‍याला कोणत्‍याही प्रकारे धमकावले जात असेल तर तो पोलिस संरक्षणाची मागणी करू शकतो. कोणत्‍याही सार्वजनिक कार्यक्रम करत नाही, तोपर्यंत ही सवलत असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -