- २० व्या दिवशीही कमाईचा जोर कायम
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२६ हे वर्ष सुवर्णकाळ ठरत असून बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची जोरदार घोडदौड सुरू आहे. या यशस्वी चित्रपटांच्या यादीत आता ‘देऊळ बंद २’ने आपले नाव ठळकपणे नोंदवले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर कमाईचे अनेक विक्रमही मोडीत काढले आहेत. ('Deool Band 2' Box Office Collection)
२० व्या दिवशीही कमाईचा जोर कायम :
१० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘देऊळ बंद २’ने प्रदर्शनाच्या २० व्या दिवशी १.१० कोटी रुपयांची कमाई केली. १९ व्या दिवसाच्या तुलनेत कमाईत किरकोळ ४.३४ टक्के घट झाली असली तरी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील पकड अजूनही मजबूत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत चित्रपटाने ६२ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन आणि ७३.१६ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट ७५ कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला आहे. ('Deool Band 2' Box Office Collection)
MUMBAI : यशराज फिल्म्सच्या बहुचर्चित 'स्पाय युनिव्हर्स'मधील आगामी 'अल्फा' (Alpha) चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा ...
आठवड्यानुसार कमाई :
‘देऊळ बंद २’च्या कमाईचा आलेख सातत्याने वर चढताना दिसत आहे.
पहिला आठवडा – ३०.२ कोटी रुपये दुसरा आठवडा – २२.४ कोटी रुपये १६ वा दिवस – १.४ कोटी रुपये १७ वा दिवस – २.६ कोटी रुपये १८ वा दिवस – ३.१५ कोटी रुपये १९ वा दिवस – १.१५ कोटी रुपये २० वा दिवस – १.१० कोटी रुपये ('Deool Band 2' Box Office Collection)
मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट :
या चित्रपटाने आता मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘वेड’च्या ६१.२ कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकत ‘देऊळ बंद २’ मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत सध्या ‘राजा शिवाजी’ १०५.६४ कोटी रुपयांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ‘सैराट’ (९० कोटी) आणि ‘बाईपण भारी देवा’ (७६.२८ कोटी) यांचा क्रमांक लागतो. आता ६२ कोटी रुपयांच्या कमाईसह ‘देऊळ बंद २’ चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे. ('Deool Band 2' Box Office Collection)
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे हा त्याच्या कंटेंटसाठी नेहमीच चर्चेत असतो. कधी कधी या कंटेंटला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला तर कधी त्याच चाहत्यांनी ...
प्रेक्षकांसह समीक्षकांचाही भरभरून प्रतिसाद :
चित्रपटातील मोहन जोशी, स्नेहल तरडे आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयासोबतच प्रवीण तरडे यांच्या प्रभावी दिग्दर्शनाचेही कौतुक होत आहे. समाजातील वास्तवावर भाष्य करताना मनोरंजनाचा समतोल साधण्यात चित्रपट यशस्वी ठरल्याचे मत प्रेक्षक आणि समीक्षक व्यक्त करत आहेत. कमाईचा वेग पाहता ‘देऊळ बंद २’ लवकरच ‘बाईपण भारी देवा’च्या विक्रमालाही आव्हान देऊ शकतो, अशी चर्चा चित्रपट वर्तुळात रंगू लागली आहे. ('Deool Band 2' Box Office Collection)




