मुंबई : मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्याने चार वर्षांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारले. या प्रकरणात व्ही. बी. नगर पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा नोंदवला आहे. परवेझ सिद्धिकी याला पोलिसांनी चार वर्षांच्या मुलीच्य हत्येप्रकरणी अटक केली आहे.
परवेझ सिद्धिकी याचा त्याची दुसरी पत्नी सबा हिच्यासोबत वाद झाला. वाद वाढला आणि परवेझ सिद्धिकीने सबाला बेदम मारहाण केली. यानंतर त्याने चार वर्षांच्या आफिया हिला जोरात जमिनीवर आपटले. जमिनीवर जोरात आपटव्यामुळे आफिया गंभीर जखमी झाली. तिला उपचारांसाठी तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि आफियावर उपचार सुरू केले. पण थोड्याच वेळात आफियाने प्राण सोडले. तपासणी करुन डॉक्टरांनी आफियाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी पुढील पोलीस तपास सुरू आहे.