मुंबई : मित्राने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील अंधेरी येथे घडली. सुजीत हरिवंश सिंह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुनील परशुराम कोकाटे याला अटक केली आहे.
मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना, जन्मदात्याने चार वर्षांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारले
सुजीत आणि सुनील हे दोघे शेजारी होते तसेच एकमेकांचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ मुद्यावरुन वाद झाला. हा वाद वाढला. अखेर सुनीलने सुजीतला रस्त्यात गाठले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि हा वाद शमत नव्हता. अखेर सुनीलने चाकूने सुजीतवर हल्ला केला. या हल्ल्यात सुजीत हरिवंश सिंह याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुजीतच्या हत्येप्रकरणी सुनील परशुराम कोकाटे याला अटक केली. पोलिसांचा या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.