Saturday, March 22, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेDombivli News : प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

Dombivli News : प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं जाणून घ्या…

डोंबिवली : डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृतदेह तब्ब्ल ४० तासांनंतर कुटुंबीयांकडे देण्यात आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात धाडण्यात आला असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

GBS Update : राज्यात GBS मुळे १० मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथील मोठागाव परिसरातील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात २६ वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. बुधवारी १२ फेब्रुवारीला दुपारी तिचे सीझर करण्यात आले. यानंतर तिला जनरल वार्डमध्ये स्थलांतर करण्यात आले. मात्र तिला होणारा रक्तस्त्राव कमी होत नसल्याने तिची प्रकृती ढासळली. यामुळे तिचा रक्तदाब कमी होऊ लागल्याने खासगी डॉक्टरांना तातडीने पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचविण्यासाठी तिचे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली. मात्र यानंतर रात्री २ वाजता या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या पतीने आपल्या पत्नीवर चुकीचे उपचार झाल्याने हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर डॉक्टरांविरुद्ध ठिय्या आंदोलन केले आहे. पत्नीचा जीव घेणाऱ्या डॉक्टरांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे मृत महिलेच्या पतीने सांगितले. तब्ब्ल ४० तास मृतदेह न घेतल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

Mahakumbh Accident : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात! १० जणांचा मृत्यू, १९ गंभीर

या प्रकरणी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून वैद्यकीय स्तरावर चौकशी केली जाणार आहे. पालिकेच्या उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय त्रुटींबाबत चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. तसेच कायद्यातील तरतुदीनुसार चौकशी समितीच्या अहवाला आधी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. यानंतर म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर नातेवाईकांनी मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी उत्तरतपासणी करण्यासाठी मृत महिलेचा मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -