प्रयागराज : काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये सुरु असणाऱ्या महाकुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर अशीच घटना घडल्याचे (Mahakumbh Accident) पुन्हा घडल्याचे समोर आले आहे. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये १० जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Prayagraj)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज मिर्जापूर हायवेवर मेजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री बोलेरो आणि बस यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघतामध्ये दहा भाविकांचा मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रयागराजमध्ये सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Prayagraj Accident)