खेळाडूंच्या घरच्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'प्रवेश बंदी'

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने दुबईत होणार आहेत. पण स्पर्धेआधी बीसीसीआयने एका नव्या नियमाची घोषणा केली आहे. या नियमानुसार भारतीय खेळाडू त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जाऊ शकणार नाहीत. हॉटेलमध्येही खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना एकत्र राहता येणार नाही. बीसीसीआयचे हे नवे धोरण लगेच लागू करण्यात आले आहे.



बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमाच्या निमित्ताने ४५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळाच्या दौऱ्याच्या वेळी कुटुंबातील सदस्य खेळाडूंसोबत जास्तीत जास्त दोन आठवडे राहू शकतील. एरवी खेळाडू त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन दौरा करू शकत नाहीत. या नियमात बदल करायचा की नाही याचे सर्वाधिकार बीसीसीआयकडेच आहेत.



भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पराभव झाला. मालिका ऑस्ट्रेलियाने ३ - १ अशी जिंकली. यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी नवे धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.



अ गट - बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान
ब गट - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका



भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती



आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे वेळापत्रक (भारताचे सर्व साखळी सामने दुबईत होणार)



१९ फेब्रुवारी - कराची - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
२० फेब्रुवारी - दुबई - बांगलादेश विरुद्ध भारत
२१ फेब्रुवारी - कराची - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२२ फेब्रुवारी - लाहोर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
२३ फेब्रुवारी - दुबाई - पाकिस्तान विरुद्ध भारत
२४ फेब्रुवारी - रावळपिंडी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड
२५ फेब्रुवारी - रावळपिंडी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२६ फेब्रुवारी - लाहोर - अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड
२७ फेब्रुवारी - रावळपिंडी - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
२८ फेब्रुवारी - लाहोर - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१ मार्च - कराची - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
२ मार्च - दुबई - न्यूझीलंड विरुद्ध भारत
४ मार्च - दुबई - पहिला उपांत्य सामना अ १ विरुद्ध ब २
५ मार्च - लाहोर - दुसरा उपांत्य सामना ब १ विरुद्ध अ २
९ मार्च - अंतिम सामना
Comments
Add Comment

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि

Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील क्युटो शहरात सुरु असलेल्या सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत