26/11चा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार

वॉशिंग्टन डी. सी. : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी गुरुवारी दौऱ्यादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढले. दोन्ही देशांनी संरक्षण, संशोधन, व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. अतिरेक्यांच्या विरोधात सुरू असलेली लढाई आणखी तीव्र करण्याचाही निर्णय दोन्ही देशांनी घेतला. याप्रसंगी बोलताना ट्रम्प यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे हस्तांतरित करणार असल्याचे जाहीर केले. तहव्वूर राणा हा जगातील अतिशय वाईट प्रवृत्तीच्या लोकांपैकी एक असल्याचेही ट्रम्प म्हणाले.







तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यावसायिक आहे. त्याने व्यावसायिक कारण देत भारताचा दौरा केला. ताज, ओबेरॉयमध्ये राहून मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केली. तहव्वूर राणाच्या अतिरेकी हल्ल्यातील सहभागाबाबतचे पुरावे भारत सरकारने अमेरिकेला दिले आहेत. हे पुरावे हाती आल्यानंतर ट्रम्प यांनी तहव्वूर राणाचा ताबा भारताला देणार असल्याची घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

Iran - America War : इराणविरोधात ट्रम्प यांचा मोठा डाव? अमेरिकन लष्कराला नव्या कारवाईचे आदेश; मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढला

वॉशिंग्टन : अमेरिका (America)आणि इराण (Iran) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड

Pakistan Coal Mine Blast : बलुचिस्तान हादरलं! कोळसा खाणीतील स्फोटात ३२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

क्वेटा : पाकिस्तानातील बलुचिस्तान (Balochistan) प्रांताची राजधानी क्वेटा (Quetta) शहराजवळील एका कोळसा (Coal) खाणीत भीषण स्फोट (Blast)

Hamas : ट्रम्प यांची मोठी घोषणा! हमासच्या पूर्ण निःशस्त्रीकरणानंतर गाझातून इस्रायली सैन्य माघारी

गाझा (Gaza) संघर्ष संपवण्याच्या दिशेने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हमास (Hamas) आणि इस्रायल (Israel) यांच्यात व्यापक

Spain Migration : स्पेनच्या स्यूटा सीमेजवळ हजारोंची घुसखोरी; समुद्रातून प्रवेशाच्या प्रयत्नांत १८ जणांचा मृत्यू

स्पेन : स्पेन (Spain) आणि मोरोक्को (Morocco) यांच्या सीमेलगत असलेल्या स्यूटा (Ceuta) या स्पेनच्या स्वायत्त शहरात मोठे स्थलांतर

Iran - America War : जॉर्डनमधील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर हल्ले

वॉशिंग्टन : जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केली

World Record Flight : हवेत सलग २४ तासांपेक्षा जास्त वेळ! क्वांटास एअरलाइन्सच्या विमानाने रचला ऐतिहासिक जागतिक विक्रम

तुलूझ : ऑस्ट्रेलियन विमान कंपनी ‘क्वांटास’ने (Qantas) नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. एका विशेष