Nitesh Rane : नितेश राणे बदलत आहेत कोकणातल्या राजकीय वर्तुळातले फासे

सिंधुदुर्ग : कोकणातल्या राजकीय वर्तुळातले फासे फिरल्याची बातमी समोर आली. देवगड नगरपंचायतचे दोन नगरसेवक तसेच तालुकाप्रमुख आणि शिरगांव ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलंय. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांना भाजपाच्या दिशेने वळवले आहे. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी भाजप पक्षामध्ये प्रेवेश केला आहे. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशानंतर सिंधुदुर्गातही अनेक नेत्यांनी कमळ हाती घेतल्याचं दिसून येत आहे. यावर मंत्री नितेश राणे म्हणाले," ही फक्त सुरवात आहे. नगरसेवक, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे. आम्हाला फक्त तारीख ठरवायची आहे. उबाठा नावाचा गट आता संपलेला आहे.



बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. आणि म्हणून जिल्ह्याचा विकास केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेत वाढत आहे. त्यामुळे चांगले कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र आम्ही चांगल्यातले चांगले कार्यकर्ते घेतो घाण घेत नाही." येणाऱ्या काळात भाजपा पक्ष कोकणात एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!