जयपूर : राजस्थानमधील धौलपूरमध्ये वहिनी आणि दीराच्या नात्याला काळीमा फासाणारी घटना घडली आहे. वहिनीला घरात एकटेच पाहून दीराच्या अंगातील सैतान जागा झाला असून त्याने घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी पीडित महिला तिच्या रूममध्ये एकटीच होती. तिला एकटं पाहून दीर खोलीत गेला. त्यानंतर दीराने वहिनीवर जबरदस्तीने बलात्कार केला. या कृत्यानंतर महिलेने आरडाओरड सुरूवात केली. त्यावेळी शेजारी घरात आले असता आरोपी दीराने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, नवरा घरी आल्यानंतर पीडित महिलेने सर्व घटना सांगितली. त्यानंतर नवऱ्याने बायकोसोबत पोलीस स्टेशन गाठत भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सध्या आरोपी दीर फरार झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Crime)