Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीLadki Bahin Yojana : आता 'या' लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २,५०० रुपये!

Ladki Bahin Yojana : आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २,५०० रुपये!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) सुरु केली. या योजनेद्वारे महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जात आहेत. तर ही रक्कम वाढवून लवकरच २ हजार १०० रुपये दिले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. दरम्यान या योजनेचा फायदा आता नवी दिल्लीतील महिलांना देखील होणार आहे. (Delhi Government Scheme)

GBS : पुण्यात जीबीएसचा वाढता फैलाव!

सध्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून भाजपा पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आता भाजपा सरकार स्थापन होणार असून अनेक योजनांमध्ये महत्त्वाचे बदल करणार आहेत. दिल्लीतील महिलांना आता लवकरच २५०० रुपये मिळणार आहे.

यापूर्वी आम आदमी पार्ट सरकार महिला सन्मान योजनेत दर महिन्याला १ हजार रुपये देत होती. मात्र, भाजप सरकारने २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता दिल्लीतील महिलांना पुढील महिन्यापासून २ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय महिला दिवशी महिलांना २५०० रुपये देण्यास सुरुवात केली जाईल. आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. त्यामुळे त्याआधी महिलांना हे पैसे मिळू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -