Gold Rate Today : सोन्याच्या दरात तेजी सुरुच! जाणून घ्या काय आहे आजचा भाव

Share

मुंबई : सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या कालावधीत सोनं चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. (Gold Rate Today)

मिळालेल्या माहितीनुसार, काल सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आज मंगळवार (दि. ११) रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात ८७० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर ८७ हजार ०६० रुपयांवरुन ८७ हजार ९३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर ८ हजार ७०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८ लाख ७० हजार ६०० रुपयांवरुन ८ लाख १९ हजार ३०० रुपये इतका झाला आहे.

इतर शहरांमध्ये काय आहे सोन्याचा भाव?

मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी प्रति १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा दर ८० हजार ६०० रुपये आहे. तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ८७ हजार ९३० रुपये आहे.

दरम्यान चैन्नई, कोलकाता, बंगळूरु, हैदराबाद या देशात १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ८७ हजार ९३० रुपये तर २२ ग्राम ८० हजार ६०० रुपये आहे. नवी दिल्ली येथे १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ८८ हजार ०८० रुपये तर २२ ग्राम ८० हजार ७५० रुपये आहे. तर अहमदाबाद येथे १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ८० हजार ६५० रुपये तर २२ ग्राम ८७ हजार ९८० रुपये आहे. (Gold Rate Today)

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

39 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

59 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago