Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेअनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू

अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू

वसई : प्रियकराने अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे विकास वालकर यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील मानसिक तणावाखाली वावरत होते. ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांचे वसईतील घरी निधन झाले.

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

श्रद्धाची २०२२ मध्ये दिल्लीत हत्या झाली होती. लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. टप्प्याटप्प्याने तो श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फेकून आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू केले होते.

अभिनेत्री सोनम कपूर अहुजाचे कुटुंब वादाच्या भोवऱ्यात

वसईतून आफताबसोबत दिल्लीला गेलेल्या श्रद्धाशी दीड महिन्यापासून संपर्क होत नसल्यामुळे विकास वालकर यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. श्रद्धा आणि आफताच्या नात्याचा अंदाज आल्यावर पोलिसांनी आफताबच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले. आफताबचा संशय वाटू लागल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीतून श्रद्धाच्या हत्येची माहिती पोलिसांच्या हाती आली. सध्या श्रद्धाच्या हत्येच्या आरोपात आफताब दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -