छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये आज रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये ही चकमक झाली. या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर दोन सैनिक शहीद झाले आहेत आणि २ जखमी झाले. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. (Chhattisgarh Encounter)
Pune News : पुण्यात आढळली पाकिस्तानी चलनाची नोट! पोलिसांचा तपास सुरु
बिजापूर परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यानंतर शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूरच्या फरेसगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय उद्यान परिसरात महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर आज सकाळपासूनच ही चकमक सुरू आहे. सकाळी ८ वाजल्यापासून डीआरजी बिजापूर, एसटीएफ, सी ६० जवानांसोबत चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Chhattisgarh Encounter)
या चकमकीत अनेक नक्षलवादी मारले गेले असून आतापर्यंत ३१ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. यासध्या इतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. या परिसरात शोध मोहीम राबवल्यावर ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.