Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीपिझ्झा ऑर्डर केला म्हणून हॉस्टेलमधून विद्यार्थिनींची हकालपट्टी

पिझ्झा ऑर्डर केला म्हणून हॉस्टेलमधून विद्यार्थिनींची हकालपट्टी

पिंपरी : पिझ्झा ऑर्डर केला म्हणून हॉस्टेलमधून विद्यार्थिनींची हकालपट्टी झाली. ही घटना पिंपरीतील मोशी परिसरातील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये घडली. या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी भूक लागली म्हणून खाण्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला. बाहेरुन खाण्यासाठी पदार्थ मागवण्यात आल्याचे लक्षात येताच हॉस्टेलच्या सुपरवायझर मिनाक्षी नारहारे यांनी पिझ्झा ऑर्डर करणाऱ्या मुलींची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली.

अनेक तुकडे करून ठार मारलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू

एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनींपैकी नेमका कोणी पिझ्झा ऑर्डर केला हे कळले नाही म्हणून चौघींची हॉस्टेलमधून हकालपट्टी करण्यात आली. हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलेल्या चौघींना एक महिन्यासाठी हॉस्टेलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन हॉस्टेलमध्ये बाहेरुन पदार्थ ऑर्डर करुन मागवण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन झाले म्हणून चार विद्यार्थिनींची हॉस्टेलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विद्यार्थिनींवर झालेल्या कारवाईमुळे त्यांचे पालक नाराज असल्याचे वृत्त आहे. समाजिक न्याय विभागाने बाहेरुन पदार्थ मागवणाऱ्यांना थेट हॉस्टेलमधून बाहेर काढण्याबाबत सरकारी आदेश काढला आहे का ? की सुपरवायझर यांनी परस्पर चार विद्यार्थिनींनी हॉस्टेलमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे; असा प्रश्न विद्यार्थिनींचे पालक उपस्थित करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -