Tuesday, March 18, 2025
Homeक्रीडाउमेश गुप्ता महाराष्ट्र श्री, गतविजेत्या हरमीत सिंगवर केली मात

उमेश गुप्ता महाराष्ट्र श्री, गतविजेत्या हरमीत सिंगवर केली मात

पुणे : मूर्ती छोटी, पण किर्ती महान. अवघ्या सव्वा पाच फूट उंचीच्या मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने गतविजेत्या हरमीत सिंग आणि कमलेश अच्चरा या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र श्रीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. महिलांच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्याच रेखा शिंदेने बाजी मारली. गेल्यावर्षीही तिनेच मिस महाराष्ट्रचा मान मिळवला होता. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात पुण्याच्या नरेंद्र व्हाळेकर आणि शुभम पवार यांनी अव्वल स्थान पटकावले. चार गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी सांघिक विजेतेपदाचाही मानही संपादला.

कधी होणार भारत – इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ? कसा आणि कधी बघता येणार ?

पुण्यातील थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत गणेश आणि क्रीडाभक्तांना पीळदार थराराचा अनुभव घेता आला. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी स्टेजवर नऊही गटविजेते उतरले तेव्हा सर्वांचा नजरा कमलेश अच्चरा आणि हरमीत सिंगकडे वळल्या होत्या. या दोघांपुढे उंचीने कमी असलेला उमेश गुप्ता पीळदार वाटत होता. त्याची उंची, त्याच्या स्नायूंचे आकारमान निश्चित कमी होते, पण त्याच्या आखीवरेखीवपणा आणि पीळदारपणाने त्याला महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाचे ऑस्कर जिंकून दिले. विशेष म्हणजे गेल्यावर्षी झालेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा त्याने आपले गेले अपयश धुवून काढताना महाराष्ट्र श्रीचा मान पटकावला. महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी सर्वात प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत १६० पुरुष शरीरसौष्ठवपटूंसह फिजीक स्पोर्ट्सचे ५५ स्पर्धक आणि महिलांच्या गटातील १२ पीळदार सौंदर्यवती असे एकंदर २२७ स्पर्धकांनी मंचावर उतरून महाराष्ट्राची ताकद दाखवली.

पॅट कमिन्स पुन्हा बाबा झाला, पत्नी बेकीनं दिला मुलीला जन्म

या दिमाखदार स्पर्धेत विजेत्यांवर तब्बल दहा लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला. पुरस्कार सोहळा आयोजक नवनाथ काकडे, आमदार राहुल कूल, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार बापूसाहेब पठारे, आयबीबीएफचे व एबीबीएफचे सरचिटणीस डॉ.संजय मोरे, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस अजय खानविलकर, खजिनदार सुनील शेगडे, राजेश सावंत, राजेंद्र सातपूरकर, नरेंद्र कदम, विशाल परब यांच्या उपस्थितीत पार पडला.

India vs England: पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर सहज विजय

महाराष्ट्र श्री २०२५ स्पर्धेचा निकाल :

५५ किलो वजनी गट: १.हनुमान भगत (रायगड), २. जुगल शिवले (रायगड), ३.राजेश तारवे (मुंबई), ४.सोमनाथ पाल (पुणे), ५.अक्षय गव्हाणे (मुंबई उपनगर), ६. निलेश गजमल (पुणे)

६० किलो : १. संदीप सावळे (मुंबई उपनगर), २. बाळू काटे (पुणे), ३. सुयश सावंत (मुंबई उपनगर), ४. गणेश पाटील (रायगड). ५.दुर्गेश मेहेर (पश्चिम ठाणे), ६. अजित गोंडफाळे (पुणे).

६५ किलो: १.उदेश ठाकूर (रायगड), २. सचिन सावंत ( पुणे), ३.नदीम शेख ( मुंबई), ४.नरेंद्र व्हाळेकर (पुणे), ५.निलेश धोंडे (पुणे),६.कोईरंबा (पश्चिम ठाणे)

७० किलो: १.उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), २. संकेत भरम (मुंबई उपनगर), ३. प्रशांत कोराळे (पुणे), ४. दीपक राऊळ (रायगड), ५.विशाल धावडे (मुंबई उपनगर), ६.शिवांग वगळ (नाशिक).

७५ किलो: १.गणेश उपाध्याय (मुंबई उपनगर), २.भगवान बोराडे (मुंबई उपनगर), ३. उदय देवरे (रायगड), ४.आकाश गडमल (पुणे), ५. विश्वम्भर राऊळ (मंबई उपनगर), ६. अकबर कुरेशी (सोलापूर).

८० किलो: १.कमलेश अच्चारा (पुणे), २. संजय प्रजापती (मुंबई उपनगर), ३.आमेर पठाण (छ. संभाजीनगर), ४. महेंद्र पाचपुते (पिंपरी चिंचवड), ५. मयूर शिंदे (नाशिक), ६.अमोल जाधव (मुंबई उपनगर),

८५ किलो: १.प्रभाकर पाटील (रायगड), २.अक्षय शिंदे (पुणे ),३. फिरोज शेख (पुणे), ४.संदेश सावंत (सिंधुदुर्ग), ५.प्रणव खातू (मुंबई उपनगर), ६.उदय ननावरे (पुणे).

९० किलो: १.सोहम चाकणकर(पुणे), २.अभिषेक लोंढे (मुंबई उपनगर ), ३.सुखमीत सिंग (रायगड), ४. उबेद पटेल – (मुंबई ), ५.प्रणव सुदेवार (पुणे) , ६.अरुण नेवरेकर (मुंबई).

९० किलो वरील: १.हरमित सिंग (मुंबई उपनगर), २.निलेश रेमजे (मुंबई उपनगर), ३.प्रवीण खोब्रागडे (पुणे), ४.नितीन दोडके (छ. संभाजीनगर) ५.अभिषेक गायकवाड (रायगड)

मिस महाराष्ट्र-महिला शरीरसौष्ठव : १. रेखा शिंदे (मुंबई उपनगर), २.किमया बेर्डे (मुंबई), ३.ममता वेझरकर (मुंबई उपनगर).

मेन्स फिजिक (१७० सेमी) : १. नरेंद्र व्हाळेकर (पुणे), २.अनिकेत पाटील (रायगड)३. सचिन बोईनवाद (पश्चिम ठाणे), ४.जी. शंकर शंभूका (पुणे), ५.अक्षय दांडेकर (कोल्हापूर)६. साहिल सावंत (कोल्हापूर).

मेन्स फिजिक (१७० सेमीवरील): १.शुभम पवार (पुणे), २.स्वागत पाटील (रायगड), ३.रत्नेश सिंग (पालघर),
४.आकाश दंडमल (पुणे), ५) निलेश गुरव (मुंबई), ६.रोहन गोगावले (नाशिक)

किताब विजेता: उमेश गुप्ता (मुंबई उपनगर)

उपविजेता: कमलेश अच्चरा (पुणे)

प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटू:उद्देश ठाकूर (रायगड)
उत्कृष्ट पोजर: हरमित सिंग (मुंबई उपनगर)

सांघिक विजेतेपद: मुंबई उपनगर ( २४८ गुण )
उपसांघिक विजेतेपद: पुणे (१७३)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -