सिडनी : ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेआधी पुन्हा बाबा झाला आहे. पॅटची पत्नी बेकी बेकी कमिन्सनं एका मुलीला जन्म दिला. बाबा झालेल्या पॅटने क्रिकेटमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे.
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या संघात पॅटचा समावेश करण्यात आलेला नाही. पॅट कमिन्सला दुखापतीमुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. याच सुमारास तो बाबा झाला. या दोन कारणांमुळे त्याने काही दिवसांसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नाही.
पॅट कमिन्स आणि बेकी या दोघांचे ऑगस्ट २०२२ मध्ये लग्न झाले. पण पॅट आणि बेकी लग्नाआधीच पहिल्या बाळाचे पालक झाले होते. पॅटच्या पहिल्या बाळाचे नाव अल्बी आहे आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे नाव एडी असे आहे. अल्बीचा जन्म ऑक्टोबर २०२१ मध्ये आणि एडीचा जन्म नुकताच झाला आहे.
पॅट कमिन्सची कामगिरी
ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स याने ६७ कसोटी, ९० एकदिवसीय आणि ५७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २९४ विकेट्स घेतल्या आहेत तर १४५४ धावाही केल्या आहेत. याशिवाय, कमिन्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये १४३ विकेट्स घेतल्या आहेत आणि ५३७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६६ विकेट्स घेतल्या आहेत आणि १५८ धावा केल्या आहेत.