Thursday, March 27, 2025
Homeक्रीडाकधी होणार भारत - इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ? कसा आणि...

कधी होणार भारत – इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ? कसा आणि कधी बघता येणार ?

कटक : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी २० सामन्यांची मालिका भारताने ४ – १ अशी जिंकली. यानंतर सुरू झालेल्या भारत – इंग्लंड एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने चार गडी राखून जिंकला. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना झाला आहे आणि दुसरा सामना रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून कटक येथे सुरू होणार आहे. कटकच्या बाराबती स्टेडियम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर आणि थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर होणार आहे.

पॅट कमिन्स पुन्हा बाबा झाला, पत्नी बेकीनं दिला मुलीला जन्म

मालिकेत भारताने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे कटकमध्ये जिंकून टीम इंडियाला मालिका २ – ० अशी जिंकण्याची संधी आहे.

Champion Trophy Song : जितो बाजी खेळ के! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अधिकृत गाणे आयसीसीने केले रिलीज

कटकच्या सामन्यासाठी अंतिम संघ या खेळाडूंमधून निवडणार

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल (यष्टीरक्षक) , यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , हर्षित राणा , कुलदीप यादव , मोहम्मद शमी , वरुण चक्रवर्ती , वॉशिंगटन सुंदर , विराट कोहली , रिषभ पंत, अर्शदीप सिंग

इंग्लंड : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक) , जोस बटलर (कर्णधार) , बेन डकेट , जो रूट , हॅरी ब्रूक , जेकब बेथेल , लियाम लिव्हिंगस्टोन , ब्रायडन कार्स , आदिल रशीद , जोफ्रा आर्चर , साकिब महमूद , गस अ‍ॅटकिन्सन , मार्क वूड , जेमी ओव्हरटन , जेमी स्मिथ

India vs England: पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर सहज विजय

भारत विरुद्ध इंग्लंड, एकदिवसीय सामन्यांची मालिका, सर्व सामने दुपारी दीड वाजल्यापासून सुरू

  1. पहिला सामना – भारताचा चार गडी राखून विजय
  2. दुसरा सामना – बाराबती स्टेडियम, कटक
  3. तिसरा सामना – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -