Wednesday, April 29, 2026

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि घटनेची माहिती घेतली. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. मदतकार्य वेगाने सुरू आहे.

कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. दुर्घटना घडण्याचे कारण तपासण्यासाठी पोलिसांच्या नेतृत्वात तपास होणार आहे. मदतकार्य संपल्यावर तपासकार्याला वेग येईल, असे पोलिसांनी सांगितले.

बंगळुरूत बुधवारी २९ एप्रिल रोजी संध्याकाळी वातावरण बदलले आणि मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर वाढला आणि थोड्या वेळाने भिंत कोसळली. स्थानिकांच्या मते संरक्षक भिंत आधीच कमुकवत झाली होती. यामुळे ही दुर्घटना झाली. या प्रकरणी नियमानुसार तपास होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा