ठाणे : बदलापूरमधील बलात्कार आणि अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण चर्चेत असतानाच आता आणखी एका शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या (Molestation) घटनेने खळबळ उडाली आहे.
बदलापूर येथील एका खासगी इंग्रजी शाळेत १४ वर्षीय मुलीची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ४२ वर्षीय शिक्षकाला अटक केली आहे.
बदलापूर पश्चिम पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटल्याप्रमाणे, पीडित मुलगी ही इयत्ता नववीत शिकत आहे. या विद्यार्थिनीने जबाबात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शिक्षक तिची छेडछाड करत होता आणि अनावश्यक गप्पा मारत होता.
Tamilnadu : धक्कादायक! तीन शिक्षकांचा विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार
गुरुवारी सकाळी मात्र त्याने तिला अनुचित प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने घरी जाऊन तिच्या पालकांना सर्व काही सांगितले. पालकांनी ताबडतोब स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला त्याच्या घरातून अटक केली.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, दुसऱ्या एका खाजगी शाळेतील ४ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर तिथे काम करणाऱ्या सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केले होते. ज्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. आरोपी अक्षय शिंदेचा नंतर कथित पोलीस चकमकीत मृत्यू झाला. तर कालच तामिळनाडूच्या कृष्णागिरीमधील बारगुर येथील शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थीनीवर ३ शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.