मुंबई : रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधी रेपो दरात व्याजदर कपात मे २०२० मध्ये केली होती. यानंतर आता फेब्रुवारी २०२५ मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात व्याजदर कपात केली आहे. या निर्णयामुळे बँकांकडून मिळणारी गृहकर्ज, वाहनकर्ज आदी प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यांच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने शुक्रवार ७ फेब्रुवारी २०२५ रोजी रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे. यामुळे रेपो दर (रेपो रेट) ६.५० टक्क्यांवरुन ६.२५ टक्क्यांवर आला आहे. केंद्र सरकारने नव्या करप्रणालीनुसार वार्षिक १२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केल्याचे जाहीर केले. या घोषणेला काही दिवस होत नाहीत तोच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का व्याजदर कपात केली आहे. या लागोपाठच्या निर्णयांमुळे देशातील आर्थिक उलाढालींना चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे.
GBS in Maharashtra : महाराष्ट्रात जीबीएसमुळे ६ मृत्यू, राज्यात जीबीएसचे १७३ रुग्ण
देशाचा आर्थिक विकासदर ६.७ टक्के राहील आणि घाऊक बाजारपेठेतील महागाईचा दर हा ४.२ टकक्यांच्या आसपास राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला.