Crime News : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकातील लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांनमध्ये संतापाची लाट उसळी आहे. या प्रकरणामुळे मेट्रो स्थानकांवरील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास संबंधित विद्यार्थिनी नेल आर्टच्या क्लाससाठी जात होती. डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनला पोहोचल्यानंतर ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढली. त्यावेळी लिफ्टमध्ये ती एकटी असल्याचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे.
लिफ्टमधून बाहेर पडताच कुटुंबीयांना दिली माहिती
घटनेनंतर विद्यार्थिनी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत लिफ्टमधून बाहेर आली. तिने तत्काळ आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण घडनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांसह ती कांदिवली पोलीस ठाण्यात पोहोचली. मग तिने त्या माणसाविरुद्ध तक्रार दाखल केली.
दक्षिण लेबनानमध्ये इस्रायली सैन्याने रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ब्यूफोर्ट किल्ल्यावर ताबा मिळवला आहे. गेल्या 26 वर्षांतील ...
विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन झाल्याने पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.पोलीस सध्या मेट्रो स्थानकातील आणि लिफ्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी CCTV चा वापर केला जात आहे. त्या व्यक्तीच्या हालचाली व येण्याजाण्यवर लक्ष्य दिले जात आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मेट्रो सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
गर्दीच्या आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या मेट्रो स्थानकातच अशी घटना घडल्याने महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी मेट्रो प्रशासनाकडे सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणी केली असून, महिला प्रवाशांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाची सखोल चोकाशी सुरु केली जात आहे.






