Sunday, May 31, 2026

Goregaon-Mulund Road Project : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी १५० बांधकामे पाडली

Goregaon-Mulund Road Project : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी १५० बांधकामे पाडली

मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामात अडथळा ठरत असलेली १५० बाधित ठरणारी बांधकामे हटविण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या टी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रविवारी (दिनांक ३१ मे २०३६) केली. अतिक्रमण निर्मूलन कारवाई अंतर्गत अमर नगर, खिंडीपाडा येथील रहिवासी आणि वाणिज्यिक १५० अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली असून उर्वरीत २३४ अनधिकृत बांधकामे पुढील आठवड्यात पाडण्यात येणार आहेत.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड अर्थात जोडरस्त्याची लांबी १२. २० किमी आहे. या जोडरस्त्याचे काम चार टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात रस्ता, भूमिगत बोगदा, उड्डाणपूल आदी कामाचा समावेश आहे. टी विभागाच्या हद्दीतील अमर नगर, खिंडीपाडा येथील सुमारे ३८४ बांधकामे जोडमार्गाच्या उभारणीला बाधित ठरणारी होती. या बांधकामांपैकी १५० बांधकामं पाडण्यात आली. यात काही व्यावसायिक आणि काही निवासी बांधकामं होती. या प्रकरणी नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

उपायुक्त (परिमंडळ ६ ) यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त 'टी' यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे १० अभियंते, १०० कर्मचारी यांच्या सोबत २ पोकलेन संयंत्र, ४ जेसीबी संयंत्र, १० डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या नेतृत्वाखालील ५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >