Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीSangamner : संगमनेरमध्ये १० ई-टॉयलेटसाठी एक कोटींचा निधी

Sangamner : संगमनेरमध्ये १० ई-टॉयलेटसाठी एक कोटींचा निधी

अहिल्यानगर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे संगमनेर शहर हे वैभवशाली ठरले आहे. याच बरोबर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेला विविध पारितोषिके मिळाले आहेत. शहरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन जनतेच्या सोयीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करून दहा ई-टॉयलेटसाठी एक कोटी रुपयांचा निधी व जोर्वे नाका येथे भव्य क्रीडांगण विकसित करण्याकरता एक कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. यामधून संगमनेर शहरात अद्यावत १० ई-टॉयलेटसह भव्य क्रीडांगण उभे राहणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

धनंजय मुंडेंचे १९९८ मध्येच झाले पहिले लग्न, करुणा शर्माच पहिली पत्नी

याबाबत दिलेल्या माहिती बाबत आ. सत्यजीत तांबे म्हणाले की,लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात विकसित व वैभवशाली शहर आहे. येथे मोठी बाजारपेठ सुरक्षितता व विश्वास असल्याने नागरिकांची सातत्याने मोठी वर्दळ असते. येणाऱ्या नागरिकांची टॉयलेटची व्यवस्था व्हावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे ३० जानेवारी २०२४ रोजी १० इ टॉयलेटसाठी एक कोटी रुपये निधी व जोर्वे नाका येथील परिसरात भव्य क्रीडांगण विकसित करणे कामी करता १ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत २१ फेब्रुवारी २०२४ रोजी या कामांना निधी मंजूर केला. परंतु लोकसभा विधानसभा निवडणुक आचार संहिता आणि प्रशासकीय विलंबामुळे हे काम थांबले होते. मात्र आता नव्याने हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील नागरिकांसाठी आता अत्याधुनिक असे दहा इ टॉयलेट उभे राहणार असून जोरवे नाका परिसरात भव्य क्रीडा संकुल साकार होणार आहे.

या ई-टॉयलेट मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान,टचलेस ऑपरेशनसाठी सोलर लाइटिंग सिस्टीम व पर्यावरण पूरक ऊर्जा वापरण्यासाठी वॉटर रिसायकलिंग युनिटचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. याचबरोबर तरुणांना खेळण्या साठी जोर्वे नाका परिसरात भव्य क्रीडांगण निर्माण होणार असल्याची माहिती आ.तांबे यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -