पश्चिम रेल्वे लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवा मंगळवारी विस्कळीत झाली होती. दोन ते तीन तास ही सेवा खंडित झाली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून समजली आहे. तसेच वेग मर्यादा कमी झाल्याने सर्व लोकल धीम्या गतीने चालत होत्या. परिणामी संपूर्ण वेळापत्रक कोलमडले असून ऐन गर्दीच्या वेळीच ही समस्या उद्भवली असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.


एका रेल्वे प्रवाशाने याबद्दल ट्वीटरवर तक्रार केली आहे. गेल्या अर्धा तासांपासून अनेक लोकल गाड्या या बोरिवली, विरार, वसई, वांद्रे, जोगेश्वरी, दादर यांसह विविध ठिकाणी थांबल्या आहेत. या ट्रेन साधारण ३० ते ३५ मिनिटे उशीराने धावत आहेत. विशेष म्हणजे अनेक एसी लोकलही उशीराने सुरु आहेत.



गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे लोकल उशिराने धावत आहेत. किती वाईट सेवा आहे, असा प्रश्न एका प्रवाशाने विचारला आहे. त्यावर पश्चिम रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.


पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ट्रॅक देखभालीचे काम सुरु आहे. त्यामुळे ट्रेनच्या वेगावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे अनेक ट्रेन या उशीराने धावत आहे. तुम्हाला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करत आहोत, असे पश्चिम रेल्वे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Health News : रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा सीएसआरच्या माध्यमातून, आयुक्तांनी दिले आरोग्य विभागाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या चाचण्यांसाठी मोठ्या आणि अवजड उपकरणांच्या वापरासाठी

Mumbai News : डोंगरीतील ९ अनधिकृत दुकानांवर महापालिकेचा हातोडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या डोंगरी भागात पुन्हा एकदा कारवाईचा हातोडा फिरु लागला असून

Mumbai : सरकारी योजनांचा फायदा कमी कालावधीत मिळवून द्या, आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक स्वरूपाच्या आरोग्य

Lokshahi Din : मुंबईत २० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ‘महिला लोकशाही दिन’

मुंबई : समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी

Megablock : मध्य रेल्वेचा रविवारी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे रविवार १९ एप्रिल २०२६ रोजी पनवेल आणि वाशी विभागांदरम्यानच्या हार्बर मार्गावर तसेच पनवेल आणि

Central Railway : मध्य रेल्वेची १२ डब्यांची स्वयंचलित उघड - बंद होणाऱ्या दरवाजांची नॉन एसी लोकल तयार

मुंबई : मध्य रेल्वेची १२ डब्यांची स्वयंचलित उघड - बंद होणाऱ्या दरवाजांची नॉन एसी अर्थात साधी लोकल (इएमयू रेक) तयार