Megablock : मध्य रेल्वेचा रविवारी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे रविवार १९ एप्रिल २०२६ रोजी पनवेल आणि वाशी विभागांदरम्यानच्या हार्बर मार्गावर तसेच पनवेल आणि ठाणे विभागांदरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.


मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वाशी सेक्शनवर विशेष गाड्या धावतील. प्रवाशांच्या सोयीसाठी मेगाब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. तसेच मेगाब्लॉक कालावधीत पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील. देखभाल आणि दुरुस्तीची कामे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या