Lokshahi Din : मुंबईत २० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ‘महिला लोकशाही दिन’

मुंबई : समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत दर महिन्याला ‘महिला लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येतो. यंदा सोमवार २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली आहे. महिला लोकशाही दिनासाठी तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७ बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई – ४०००१८ येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.


इच्छुक महिलांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज वैयक्तिक स्वरूपाचा असावा, तसेच आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज, सेवा किंवा आस्थापनाविषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरूप नसलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


महिलांच्या हक्कांचे संरक्षण, न्याय मिळवून देणे आणि त्यांना सुलभ मार्गदर्शन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असून, पात्र महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२४९२२४८४ या क्रमांकावर संपर्क साधा.

Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि