Mumbai : सरकारी योजनांचा फायदा कमी कालावधीत मिळवून द्या, आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधांसाठी ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ (एमआयएएस) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रयत्न करावेत. तसेच प्रणाली अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या माहिती आणि डॅशबोर्डचा नियमितपणे आढावा घ्यावा. रुग्णांसाठी आरोग्य सुविधा सहज आणि तंत्रज्ञानस्नेही स्वरुपात उपलब्ध होतील याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा रुग्णांना कमी कालावधीत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘एच. एम. आय. एस.’ सेवेशी उत्तमरित्या संलग्न करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी आजच्या बैठकीदरम्यान दिल्या.


सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय येथील विविध वैद्यकीय कक्षांच्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी शुक्रवारी १७ एप्रिल २०२६ रोजी भेट दिली. रुग्णालय पुनर्विकास, विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य सुविधांवर येणारा ताण कमी करणे यासारख्या विषयांच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते. केईएम रूग्णालयातील नोंदणी कक्ष, अतिदक्षता विभाग, पुरूष सर्वसाधारण कक्ष, अपघात विभाग याठिकाणी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी स्थळभेट दिली. तसेच रुग्णालयातील विविध विभागांचे सुरू असलेले प्रकल्प, विविध वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा विकास, रुग्णालयातील नवीन इमारतींचा विकास, रुग्णशय्या संख्यावाढ आणि विविध विभागअंतर्गत वैद्यकीय सुविधांच्या क्षमतावाढीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.


रुग्णांच्या नोंदणी कक्षाच्या ठिकाणी ‘एच. एम. आय. एस.’ प्रणालीची कार्यपद्धती महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी जाणून घेतली. तसेच वैद्यकीय तपासण्या, रुग्णांची माहिती, वैद्यकीय अहवाल यासारखा तपशील ‘एच. एम. आय. एस.’ प्रणालीमध्ये कशा पद्धतीने संलग्न करण्यात आला आहे, या बाबीचा आढावाही आयुक्त भिडे यांनी घेतला. त्यानंतर पुरूष रुग्ण कक्षाच्या ठिकाणी भेट देऊन रूग्ण नोंदणी, रुग्णालयातील कक्षात देण्यात येणारे उपचार, वैद्यकीय अहवाल, रूग्णांचा तपशील आदी बाबींची ‘एच. एम. आय. एस.’ प्रणाली अंतर्गत होणारी नोंद याचाही तपशील आयुक्त भिडे यांनी जाणून घेतला. अपघात विभाग, अतिदक्षता विभाग याठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतची माहिती त्यांनी या भेटीदरम्यान घेतली. सद्यस्थितीला एचएमआयएस प्रणालीच्या अंमलबजावणीअंतर्गत येणारी आव्हानांवर मात करून ही यंत्रणा अधिकाधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. एचआयएमएस प्रणालीअंतर्गत रुग्णाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर द्यावा, असेही निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले.

Comments
Add Comment

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

CM Devendra Fadnavis : मलईदार खात्यांवर वर्षानुवर्षे कब्जा करणारे ३१४ अधिकारी रडारवर

- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर मुंबई : मंत्रालय आणि राज्य

Vaishya Vani Community : वैश्य वाणी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मंत्री अतुल सावे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी

BMC : रस्ते अभियंत्यांना महापालिकेने खड्डे शोधण्यासाठी रस्त्यावर पिटाळले

आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या

Ganesh Murti Safety : कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींवर पोलिसांची नजर

फिटनेस स्ट्रॅबिलिटीनंतरच आगमन मिरवणुकीचा मार्ग करणार खुला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या गणरायांच्या

Cooper Hospital : कुपर रुग्णालयातील एमआयसीयू खाटांची संख्या पोहोचणार ३५वर

- नवीन २५ खाटांचा एमआयसीयू कक्षाची केली जाणार उभारणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात