Mumbai News : डोंगरीतील ९ अनधिकृत दुकानांवर महापालिकेचा हातोडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या डोंगरी भागात पुन्हा एकदा कारवाईचा हातोडा फिरु लागला असून महापालिकेच्या जी उत्तर विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या योगेश देसाई यांनी डोंगरी भागातील अनधिकृत बांधकामांना जमिनदोस्त करण्यात सुरुवात केली आहे.


महापालिकेच्या ‘बी’ विभागा अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि डोंगरी परिसरातील ९ अनधिकृत दुकाने, अनधिकृत वाहन पार्किंगकरिता रस्त्यावर लावलेले लोखंडी खांब, दुकानांचे अनधिकृत नामफलक तसेच इतर अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘बी’ विभागाकडून कारवाई करण्यात आली. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.


‘बी’ विभागातील वल्लभभाई पटेल मार्ग आणि डोंगरी परिसरात अनधिकृत दुकाने आणि पदपथावर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन या विभागांनी संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान, ९ अनधिकृत दुकाने, पदपथावरील अतिक्रमण, दुकानांचे अनधिकृत वाढीव बांधकाम, अनधिकृत वाहन पार्किंगकरिता रस्त्यावर लावलेले लोखंडी खांब, दुकानांचे अनधिकृत नामफलक हटविण्यात आले. दरम्यान, परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.


‘बी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन, अनुज्ञापन व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. डोंगरी पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस