संसदेचे अधिवेशन आणि विदेशी शक्तींवर काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी शक्तींबाबत एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण आले आहे.



देशात २०१४ पासून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाआधी विदेशी शक्तींकडून मिळालेला मुद्दा घेऊन विरोधक सरकार विरोधात बोलायचे. पण यावेळी हा प्रकार घडलेला नाही. विदेशी शक्तींकडून विरोधकांना मुद्दा मिळालेला नाही. विरोधकांनीही कोणताही मुद्दा घेऊन सरकार विरोधात बोलायला सुरुवात केलेली नाही. यावेळी हे पहिल्यांदाच घडले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य करुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टोमणा मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान मोदींनी एक संस्कृत श्लोक म्हणून दाखवला. भारतीयांवर कृपा होवो, अशी प्रार्थना पंतप्रधान मोदींनी माता लक्ष्मीला केली.



'भारत प्रजासत्ताक झाला त्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान म्हणून मला सलग तिसऱ्यांदा जनतेने देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तिसऱ्या कार्यकाळातील सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. भारताला २०२४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याच्यादृष्टीनेच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही या नियोजनाची झलक दिसेल', असे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले. देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल त्यावेळी एक विकसित राष्ट्र म्हणून जगापुढे येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताची प्रगती व्हावी; देशातील सर्व नागरिकांपर्यंत प्रगतीचे लाभ पोहोचावेत यासाठी केंद्र सरकार अविश्रांत मेहनत करत आहे. देशातील महिलांचे सबलीकरण करम्यासाठीही सरकार प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय