ठाणेकरांच्या प्रेमाखातर ठाण्यात 'जनता दरबार' भरवणार

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात जनता दरबार भरवणार अशी घोषणा राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केल्यावर ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्यात भाजपा आपला वरचष्मा राखण्यासाठी तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नवी मुंबईसारखा कारभार ठाण्यामध्ये करायचा आहे, त्यासाठी ठाण्यात ओन्ली 'कमळ' फुलवायचे असून लवकरच ठाणेकर जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा 'जनता दरबार भरवणार आहे, असा निर्धार गणेश नाईक यांनी व्यक्त केला.


भाजपचे कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे प्रभारी माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस ओंकार चव्हाण यांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी कोपरीतील आनंद बॅन्क्वेट सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. नागरी सत्काराला उत्तर देताना ना. गणेश नाईक यांनी, आजवरच्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करीत दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही, सकारात्मक राहुन जगा, असा टोला लगावून आजकाल राजकारणातील स्तर खाली गेल्याची खंत व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी, शिवसेना, राष्ट्र‌वादीनंतर आता भाजपमध्ये असल्याने शतप्रतिशत भाजपसाठीच कार्यरत राहणार असल्याचे निक्षून सांगताना, आजवर मिळालेल्या मताधिक्याचा उहापोह केला. पुर्वी पालकमंत्री असताना गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवत असत, त्याच धर्तीवर थेट जिल्हाध्यक्ष वाघुले यांना उद्देशून, प्रशासनाला आताच सांगून ठेवा, असे निर्देश देत ना. गणेश नाईक यांनी, ठाण्याच्या जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा जनता दरबार भरवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.



महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये


नाईक यांच्या घोषणेनंतर शिवसेनेन तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे. शिंदेंवे विश्वासू शिलेदार आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये, असं म्हणत प्रत्युचर दिल आहे. 'गणेश नाईक मंत्री आहेत. त्यांनी काय करावं ते आम्ही सांगू शकत नाही. तो त्यांच्या मनाचा प्रस्न आहे. आमणी महायुती आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक आम्ही सोबत लढलो आहोत. ते जर ठाण्यात जनता दरबार घेणार असतील, तर आम्ही उद्या पालघरमध्ये दरबार घेऊ. आमचे मंत्री तिकडे जनता दरवार घेतील, असा सूचक इशाराच म्हस्केनी दिला.



सर्व सदस्यांची जनता दरबार घेण्यास मुभा


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याव्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी ही राज्यातील अनेक भागात जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे, तसेम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही सदस्यांनी असे जनता दरबार घेतले पाहिजे. मुळात महायुतीतील सर्व सदस्यांनी अशा पद्धतीने जनता दरबार घेतल्यास त्याचा फायदा हा जनतेलाच होणार आहे. समजा शिवसेनेच्या अथवा राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यानी एखाद्या जिल्हयात जाऊन चार आदेश पारित केले तर त्यातून जनतेचा भलं होणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना यायावत उभा असून कुठलाही मंत्री हाय का जिल्ह्याचा नाहीतर राज्याचा मंत्री असतो. त्यामुळे तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊ शकतो. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यानी दिली आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात