Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रकोकण'गो तस्करी ही संघटीत गुन्हेगारी'

‘गो तस्करी ही संघटीत गुन्हेगारी’

चिपळूण : कुंभार्ली घाटातील गुरे तस्करी प्रकरणातील आरोपींवर जामीनपात्र कलमे लागली आहेत. या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असली तरी गुरे वाहतूक संघटीत गुन्हेगारी असल्याने या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे तसेच या आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी, अशी आपली मागणी असून यासंदर्भात पोलिस प्रशासनाशी चर्चा केली आहे. येत्या अधिवेशनात गोवंश तस्करीप्रकरणी अजामीनपात्र कडक कायदा होण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी चिपळूण येथे गर्जना सभेत दिली. हिंदू टिकला तरच देश टिकेल असे सांगतानाच आता जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Wadkhal-Alibagh Road : वडखळ-अलिबाग रस्त्याच्या कामाची टोलवाटोलवी सुरू

गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभा चिपळूणमध्ये होत असली तरी आता पुढील सभा ही कराड येथे घेतली जाईल व गुरे तस्करी व गोमांस विक्रीचे पूर्ण रॅकेटच उद‌्ध्वस्त करून टाकू, असा इशारा आ. राणे यांनी यावेळी दिला. आपण संघटीतपणे आणि आक्रमकपणे याला विरोध करून गोमातेचे रक्षण केले पाहिजे, असे आ. राणे यावेळी म्हणाले. परत गुरे वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला तर गुरे गाडीतून उतरवायची आणि ते वाहन पेटवून द्यायला मागे पुढे बघू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आ. राणे यांनी यावेळी गोरक्षकांना दिली. एका विशिष्ट वर्गातीलच लोक या व्यवसायात वारंवार आरोपी म्हणून हाती लागत आहेत. या विशिष्ट वर्गाकडून कायमच देशविघातक कृत्य केली जात आहेत. गोहत्या, लवजिहाद, लॅण्डजिहाद यांसारखे प्रकार घडत आहेत. तर भारताविरोधी कारवाई करण्यासाठी परदेशातून काही शक्ती अशा जिहादी लोकांना मदत करत आहेत. त्यामुळे यापुढे आक्रमकपणे याला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. ज्या देशात यांनी आपली संख्या वाढवली, तो देश संकटात गेला. त्यामुळे भारतात हिंदु टिकला पाहिजे, कारण हिंदु टिकला तरच देश टिकेल आणि यासाठी आपण संघटीतपणे अशा कृत्यांना प्रतिबंध करून आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे, असे आ. राणे म्हणाले.

केंद्र सरकारकडून शौर्य, सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा; महाराष्ट्र पोलीस दलाला ४८ राष्ट्रपती पदके जाहीर

यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘गोहत्या को बंद करेंगे, ये हमारा संकल्प है!’ ‘गो माता की जय’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडण्यात आले होते. कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे गुरे तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या विषयात कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ. निलेश राणे यांनी तात्काळ लक्ष घालत चिपळूणमध्ये गोमातेच्या रक्षणार्थ गर्जना सभेची घोषणा केली होती. जाहीर केल्याप्रमाणे शिक्षक पतपेढीच्या हॉलमध्ये आ. राणेंच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी २५ जानेवारी रोजी सभा झाली. सभेच्या सुरुवातीला आमदार निलेश राणे यांनी गो-मातेचे पूजन केले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली. कुंभार्ली घाटात गुरांची बेकायदा वाहतूक उघडकीस आणणारे भाजप पदाधिकारी विनोद भुरण, निहार कोवळे, मंदार भुरण यांचा आ. निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Anjaneri Fort : अंजनेरी किल्ल्यावर ट्रेकर्सनी ‘तिरंगा’ फडकावला

याप्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे अनिरूद्ध भावे, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मार्गदर्शन करताना गोमातेच्या रक्षणार्थ कडक कायदे व्हायला हवे, अशी मागणी केली. या सभेचे सुत्रसंचालन मंदार कदम यांनी केले. या सभेला मोठ्या प्रमाणावर विविध हिंदु संघटना, हिंदु बांधव आणि गोरक्षकांनी गर्दी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -