Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीAnjaneri Fort : अंजनेरी किल्ल्यावर ट्रेकर्सनी 'तिरंगा' फडकावला

Anjaneri Fort : अंजनेरी किल्ल्यावर ट्रेकर्सनी ‘तिरंगा’ फडकावला

नाशिक : भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ३५ ट्रेकर्सनी साहसी क्रीडांच्या आयोजनासह अंजनेरी किल्ल्यावर ‘तिरंगा’ फडकावला. प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला मुंबई, नाशिक आणि इतर भागातील तीन मुलांसह एकूण ३५ ट्रेकर्सनी ४२६४ फूट उंचीवरील सह्याद्री डोंगररांगातील त्रंबकेश्वरेथील अंजनेरी किल्ला चढून राष्ट्रध्वज फडकावला. हा कार्यक्रम भारत सरकार मान्यताप्राप्त: फिट इंडिया युथ क्लब, मार्क मार्शल आर्ट्स नाशिक, हेरिटेज, कल्चरल अँड अॅडव्हेंचर एक्सपिडिशन आणि नेहरू युवा केंद्र जिल्हा कार्यालय, नाशिक यांनी आयोजित केला होता.

जगातील सर्वात उंच रेल्वे रुळावरुन धावली वंदे भारत एक्सप्रेस

मार्क मार्शल आर्ट्सचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद आरिफ खान आणि नेहरू युवा केंद्र नाशिकचे जिल्हा युवा अधिकारी, कमल त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. या कार्यक्रमाचे नेतृत्व मार्क मार्शल आर्टसच्या सचिव सानिया खान, समन्वयक संदिप शर्मा, एस. गोपकुमार आणि नंदकिशोर निकाळे यांनी केले.

गोल्डन होरायझन स्कूलच्या अदिबा खान व आंचल जाडे तसेच जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, इद्रीस अहमद खान, अरुण वामन जाधव, रेवती कुऱ्हाडे, अक्षदा बर्वे, कार्तिकी भालके, दुर्वी शर्मा, राज साहेबराव मराठे, त्रिवेनी शर्मा, आरोही जडे, रोशनी शर्मा श्री कुऱ्हाडे, पियुष शर्मा , अथर्व बर्वे, तेजस भालके, पियुष निकाळे, अश्विन गोपकुमार, वैभव थेटे, दिवेश शर्मा, अयान खान, सत्यम शर्मा, चंदा शर्मा , ज्योती शर्मा, दिपक भालके, रोशनी भालके, सुप्रिया शर्मा, अविनाश जाडे आणि अर्चना जाडे यांचा समावेश होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -