Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीEmergency : कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामागची साडेसाती काही सुटेनाच!

Emergency : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामागची साडेसाती काही सुटेनाच!

‘इमर्जन्सी’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : बॉलीवूड क्विन ओळख असलेल्या कंगनाचा नुकताच इमर्जन्सी चित्रपट रिलीज झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात असलेला इमर्जन्सी खूप प्रयत्नांनी हिरवा सिग्नल मिळाल्यावर रिलीज झाला होता. मात्र रिलीज झाल्यानंतरही त्याची साडेसाती कायम आहे. पुन्हा एकदा ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर कॉपी राईट चा दावा करण्यात आला आहे.

Toll : १ एप्रिलपासून टोल ५ ते १० रुपयांनी महागणार!

कंगना रणौत दिग्दर्शित इमर्जन्सी चित्रपट १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना स्वतः इंदिरा गांधी यांच्या पेहरावात दिसत आहे. ‘इमर्जन्सी’ प्रदर्शित होण्याआधीच कंगनाला खूप अडथळ्यांना सामोरे जावं लागलं आहे. हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. पण, तो वादात अडकला होता. परंतु काही सीन्स कट केल्यानंतर सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला. मात्र असं असलं तरी आता इमर्जन्सी नव्या वादात अडकला आहे. ‘इमर्जन्सी’वर २६ जानेवारी १९५० रोजी लिहिलेल्या राष्ट्रीय कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘जनतंत्र का जन्म’ या कवितेतील ‘सिंघासन खाली करो की जनता आती है’ ही ओळ परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप आहे. ही ओळ नंतर दिनकर यांच्या प्रसिद्ध पुस्तक नील कुसुममध्ये समाविष्ट करण्यात आली. या पुस्तकाचे कॉपीराइट स्वप्ना सिंह यांच्याकडे आहेत. हे गाणं मनोज मुंतशीर यांनी लिहिलंय.

२६ ऑगस्ट २०२४ रोजी, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, ही ओळ चित्रपटात असल्याचं उघड झालं. अशा परिस्थितीत, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपट निर्मात्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. पण निर्मात्यांनी यावर कोणतेही उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता इमर्जन्सी नव्याने वादात अडकली आहे. दरम्यान चित्रपटाच्या मागची तिढा सुटणार कि वाढणारं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -