Nanded : नांदेडमधून एक मोठी बातमी समोरआली आहे. नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाला आहे. नांदेडच्या (Nanded) साठे चौकात ही घटना घडली असून शिंदेंच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात झाला आहे. नांदेडहून नायगावकडे (Naigaon) जाताना ही दुर्घटना घडली. आढावा बैठकीला जाताना ही घटना घडली आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातामुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे.
मुंबई : ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे जात होता. याच वेळी समोरून एक गाडी आली आणि ताफ्यातील चार गाड्या अचानक एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु ताफ्यातील गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. माहितीनुसार ताफ्यातील अपघातग्रस्त गाड्यांमध्ये श्रीकांत शिंदे यांचे काही कार्यकर्ते होते. तसेच आरोग्य विभागातील काही कर्मचारी होते. गाड्या एकमेकांवर आदळलेल्या असल्या तरी यात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. (Shrikant Shinde Convoy Accident )
Karnataka : कर्नाटक राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सिद्धरामय्या यांनी थेट कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ...
स्थानिक प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करावा
दरम्यान , खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसंवाद दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर असताना श्रीकांत शिंदे यांनी नायगाव (Naigaon) , मुखेड आणि देगलूर (Degalur) विधानसभा आढावा बैठक घेतली. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, ग्रामीण भागातील पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अभियान या विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक गाव, वाडी आणि घराघरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरावे, जनतेमध्ये सातत्याने संपर्क ठेवावा आणि स्थानिक प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करावा, अशा सूचना यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या.





