Jyotiba Temple : ज्योतिबाचं दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार

दख्खनचा राजाची उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरु


कोल्हापूर : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार असल्याने भाविकांना श्री ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही.मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून उद्या ( दि २१ ) पासून रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम २४ जानेवारीपर्यंत चालू राहणार असल्याने या कालावधीत मूर्तीचे दर्शन भाविकांना मिळणार नाही.



मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांच्यावतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीने ३ जानेवारी रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना मूर्तीच्या संवर्धनासाठी पत्र लिहिले होते. भारतीय पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करायचे ठरवले असल्याने मंगळवार ( दि. २१ ) ते शुक्रवार दि .२४ ) पर्यंत भाविकांना ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही. दरम्यान भाविकांना फक्त उत्सव मूर्ती आणि कळसाचे दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.

Comments
Add Comment

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर