मुंबई : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल शो २०२५ मध्ये दोन नवीन ई-स्कूटर्सचे अनावरण केले. इब्लू फिओ झेड, इब्लू फिओ डीएक्सचे अनावरण केले आणि इब्लू रोझी इको लाँच केली. इब्लू रोझी इकोची किंमत दोन लाख ९५ हजार ९९९ रुपये आहे. इब्लू फिओ झेड शहरातील लहान अंतराच्या प्रवासासाठी लो-स्पीड स्कूटर म्हणून डिझाइन करण्यात आली आहे, तर इब्लू फिओ डीएक्स उच्च दर्जाच्या परफॉर्मन्स क्षमता आणि प्रतिचार्ज जवळपास १५० किमीच्या विस्तारित रेंजसह वरचढ ठरते. तीनचाकी (एल५एम श्रेणी) इब्लू रोझी इको रेंजसोबत लास्ट-माइल कनेक्टीव्हीटी देते. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, प्रगत बॅटरी व्यवस्थापन सिस्टम्स आणि उच्च दर्जाच्या बिल्ड क्वॉलिटीसह या तीन वेईकल्स भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या भविष्याचे प्रतिनिधीत्व करतात, असे गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्हणाले.
कधी आहे २०२५ मधील पहिली कालाष्टमी ?, शनी आणि राहूच्या पीडेपासून सुटकेसाठी काय करावे ?
इब्लू फिओ डीक्स: नेक्स्ट-जनरेशन राइड:
इब्लू फिओ डीएक्स प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये शक्तिशाली ५.० केडब्ल्यू सर्वोच्च पॉवर मोटर आहे, जिला १४० एनएम सर्वोच्च टॉर्क आहे. ही स्कूटर ८० किमी/तास अव्वल गती आणि १५० किमीची रेंज देते. तसेच या स्कूटरमध्ये ११-डिग्री ग्रेडिएण्टचा सपोर्ट आहे. या स्कूटरमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड्स (इकोनॉमी/नॉर्मल/पॉवर), पूर्णत: लोडेड ७-इंच टीएफटी स्क्रिनसह ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी आहे. स्कूटरमध्ये २८-लीटर बूट स्पेस आहे आणि या स्कूटरमधील ४.२ केडब्ल्यू बॅटरी ६० व्होल्ट २० अॅम्पियर होम चार्जरचा वापर करत फक्त साडेतीन तासांमध्ये संपूर्ण चार्ज होऊ शकते.
इब्लू फिओ झेड: दर्जात्मक विश्वसनीयतेसह फॅमिली वेईकल:
इब्लू फिओ झेड भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आलेली विश्वसनीय इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये एैसपैस २५-लिटर बूट स्पेस आहे. तसेच, या स्कूटरमध्ये ड्युअल एलईडी लायटिंगसह डिटॅचेबल एलएमएफपी सिलिंड्रिकल बॅटरी सिस्टम (४८ व्होल्ट/३०एएच) आहे, जी प्रतिचार्ज ८० किमीची रेंज देते. ही स्कूटर वेईकलवर ३ वर्ष/३०,००० किमी आणि बॅटरीवर ५ वर्ष/५०,००० किमीच्या सर्वसमावेशक वॉरंटी पॅकेजसह येते.
इब्लू रोझी इको: उच्च-कार्यक्षम सोबती:
१५० एएच लि-आयन बॅटरी असलेली शक्तिशाली व पैशांचे मोल देणारी तीन-चाकी इब्लू रोझी इको सिंगल चार्जमध्ये १२० किमीहून अधिक अंतरापर्यंत रेंज देते. या वेईकलमध्ये शक्तिशाली स्टील स्केलेटल फ्रेम, सर्व व्हील्सवर हायड्रॉलिक ब्रेक्स आणि ड्रायव्हर व तिन्ही प्रवाशांसाठी आरामदायी सीट्स आहेत. वेईकलची ७.८ केडब्ल्यूएच पॉवर-पॅक बॅटरी ५८.४ व्होल्ट ४० अॅम्पियर चार्जरच्या माध्यमातून फक्त साडेतीन तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते, ज्यामधून विविध स्थितींमध्ये विश्वसनीय कार्यक्षमतेची खात्री मिळते.