भगवान शंकराच्या कालभैरव या अवताराच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा दिवस म्हणजे कालाष्टमी. हा दिवस कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो, म्हणून त्याला कृष्ण अष्टमी किंवा कालाष्टमी असे म्हणतात. कालाष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केली जाते. कालभैरवाची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि शत्रूपासून मुक्ती मिळते, असे सांगतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी कालाष्टमी म्हणून ओळखली जाते. यंदाच्या वर्षातील पहिली कालाष्टमी मंगळवार २१ जानेवारी २०२५ रोजी आहे.
वर्षभरात बारा वेळा कालाष्टमी असते. भगवान शिवाचे रुद्र रुप कालभैरव देवाची या दिवशी पूजा करतात. उपवास करुन देवाची पूजा केली जाते. कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकराच्या कालभैरव या अवताराची पूजा केल्याने शिवभक्तांच्या जीवनातील सर्व दुःख, रोग आणि अडचणी दूर होतात; असे सांगतात.
भगवान शंकराच्या कालभैरव या अवताराची कालाष्टमीला पूजा करतात. कालभैरवाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर दीप प्रज्वलन करतात. नंतर भगवान शंकराचे अथवा कालभैरवाचे नामस्मरण करतात. ‘भैरव कवच’चे पठण करतात. यामुळे शुभ कार्यातील अडथळे दूर होण्यास, प्रगती होण्यास मदत होते; असे सांगतात.
कालाष्टमीला नारळ, केशर, शेंदूर, सुपारी हे भगवान कालभैरवाला अर्पण करुन ‘ॐ तीखदन्त महाकाय कल्पान्तदोहनम्। भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातुर्माहिसि’ या मंत्राचा जप करतात. तसेच ‘कालभैरवाष्टकम्’चे पठण करतात. यामुळे शनी, राहू, केतू यांच्या पीडेपासून सुटका होण्यास मदत होते. हनुमान आणि कालभैरव या अशा दोन देवता आहेत ज्या लवकर प्रसन्न होतात. मनापासून उपासना केल्यास या देवतांकडून भक्तांना लवकर फळ मिळते.
कालभैरवाष्टकम् – Kalabhairava Ashtakam
देवराज सेव्यमान पावनाङ्घ्रि पङ्कजं
व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरम्
नारदादि योगिवृन्द वन्दितं दिगंबरं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे॥ १॥
भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं
नीलकण्ठम् ईप्सितार्थ दायकं त्रिलोचनम् ।
कालकालम् अंबुजाक्षम् अक्षशूलम् अक्षरं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे॥२॥
शूलटङ्क पाशदण्ड पाणिमादि कारणं
श्यामकायम् आदिदेवम् अक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥३॥
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं
भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन् मनोज्ञहेमकिङ्किणी लसत्कटिं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥४॥
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं
कर्मपाश मोचकं सुशर्मदायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाश शोभिताङ्गमण्डलं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ५॥
रत्नपादुका प्रभाभिराम पादयुग्मकंनित्यम्
अद्वितीयम् इष्टदैवतं निरञ्जनम् ।
मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥६॥
अट्टहास भिन्नपद्मजाण्डकोश सन्ततिं
दृष्टिपातनष्टपाप जालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपाल मालिकन्धरं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥७॥
भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं
काशिवासलोक पुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥८॥
कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशनं
ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रि सन्निधिं ध्रुवम् ॥९॥
इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम् ॥
कालभैरवाविषयी महत्त्वाची माहिती
- कालभैरव हे भगवान शिवाचे प्रकट रूप आहे.
- कालभैरव हे शत्रूंच्या संहारासाठी धारण केलेले शिवरुप आहेत.
- कालभैरव हे काशीचे कोतवाल आहेत.
- कालभैरव हे शक्तिपीठाचे रक्षक आहेत.
- कालभैरव यांची पूजा करण्यासाठी रविवार किंवा मंगळवारची संध्याकाळ शुभ मानली जाते.