सैफवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक, मारेकरी बांगलादेशी असल्याचा संशय

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad Shariful Islam Shehzad) या ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडे भारतीय असल्याचे ठोस पुरावे नाहीत. यामुळे तो बांगलादेशी असल्याचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. आरोपी बांगलादेशी असावा असा संशय निर्माण करणारे काही पुरावे जप्त केले आहेत. पण तपास सुरू असल्यामुळे या विषयावर अधिक माहिती देणे योग्य होणार नाही; असे मुंबई पोलिसांनी सांगितले. आरोपी भारतात विजय दास (बिजॉय दास) या नावाने वावरत होता. काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता. तो एका हाऊसकिपिंग कंपनीत बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता.





आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून पकडले. त्याने सैफवर हल्ला केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला मुंबईत आणले असून त्याची चौकशी सुरू आहे. पुढील काही तासांत आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. आरोपीने चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसखोरी केली होती. पण घरात विरोध झाला आणि आरोपीने चाकूने हल्ला केला; असे प्राथमिक चौकशीतून लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.



मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या सहकार्याने कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडपातून आरोपीला पकडले. आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीनजीकच्या झुडुपांमध्ये लपला होता. मोहम्मद ठाण्यातील 'रिकीज' बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याआधी तो एका पबमध्ये काम करत होता.
Comments
Add Comment

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार