मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad Shariful Islam Shehzad) या ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी मोहम्मदला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्याचा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याच्याकडे भारतीय असल्याचे ठोस पुरावे नाहीत. यामुळे तो बांगलादेशी असल्याचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. आरोपी बांगलादेशी असावा असा संशय निर्माण करणारे काही पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. पण तपास सुरू असल्यामुळे या विषयावर अधिक माहिती देणे योग्य होणार नाही; असे मुंबई पोलिसांनी सांगितले. आरोपी भारतात विजय दास (बिजॉय दास) या नावाने वावरत होता. काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता. तो एका हाऊसकिपिंग कंपनीत बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता.
आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून पकडले. त्याने सैफवर हल्ला केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला मुंबईत आणले असून त्याची चौकशी सुरू आहे. पुढील काही तासांत आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. आरोपीने चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसखोरी केली होती. पण घरात विरोध झाला आणि आरोपीने चाकूने हल्ला केला; असे प्राथमिक चौकशीतून लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या सहकार्याने कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडपातून आरोपीला पकडले. आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीनजीकच्या झुडुपांमध्ये लपला होता. मोहम्मद ठाण्यातील ‘रिकीज’ बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याआधी तो एका पबमध्ये काम करत होता.
‘मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद बांगलादेशी नाही’
मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद बांगलादेशी नाही, असा दावा त्याचे वकील संदीप शेखणे (Sandeep Shekhane) यांनी केला आहे. रविवारी झालेल्या सुनावणीवेळी पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद बांगलादेशी असल्याचा एकही पुरावा सादर केलेला नाही; असेही संदीप शेखणे म्हणाले.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल २०२५ मध्ये कॉमेंट्री करत आहे. संजय…
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) राज्यातील नियमांचे उल्लंघन करणारे…
मुंबई : प्रभादेवी – कुरणे चौक मार्गावरील बेस्टच्या बस क्रमांक १६७ मधून प्रवास करत असलेल्या…
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते…
आफ्रिकेच्या सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शो नवी दिल्ली : गिटेक्स या आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या…
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री…