PM Surya Ghar Yojana : सौर ऊर्जा प्रकल्प ठरतोय लाभदायक; वीजनिर्मितीमुळे २,४४८ ग्राहक झाले स्वावलंबी!

ठाणे : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला (PM Surya Ghar Yojana) महावितरणच्या (Mahavitran) कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.



या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते, तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. तसेच या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते.


पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांनी <https://www.pmsuryaghar.gov.in/> या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा असून सर्व सुविधा ऑनलाईन व पेपरलेस उपलब्ध आहेत.

Comments
Add Comment

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड

धारण तलावाच्या स्वच्छतेकडे महापालिका सतर्क

तलावांच्या स्वच्छतेसाठी खारफुटी हटवण्याचा प्रस्ताव नवी मुंबई : मुसळधार पावसात नवी मुंबईमध्ये पुरस्थिती

ठाण्याच्या महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी