पुणे : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक झाली आहे. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास अमरावतीच्या जवळ असणाऱ्या धामणगाव येथील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या बसमधून ३० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसचालक जागीच ठार झाला असून बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस आणि एमएसआरडीची रेस्क्यू टीम त्याठिकाणी दाखल झाले. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…