रत्नागिरी : रत्नागिरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्ञानाच्या मंदिरात विद्यार्थिनीसोबतच शिक्षकाने गैरवर्तन केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर शैक्षणिक संस्थेकडून या नराधम कंत्राटी शिक्षकाचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज मुंबईत युद्धनौका, पाणबुडीचे होणार लोकार्पण
रत्नागिरी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबतच गैरवर्तन केले आहे. याबाबत पीडित मुलीने पालकांना सांगताच पालकांनी थेट शिक्षकाला घेरून त्याला जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत दाखल झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षकाचे निलंबन केले. कंत्राटी तत्वावर असलेल्या संशयित शिक्षकाने शिक्षकाने मुलीसोबत गैरकृत्य केल्याचे समजताच पालक चांगलेच संतापले आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. तर पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी संबंधित कंत्राटी शिक्षकाला न्यायालयात हजर केले जाणार आहे.