मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगत असतानाच, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच सुनील तटकरे 'वर्षा' बंगल्यावर पोहोचल्याने अजितदादांच्या पक्षात नक्की चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन यार्डमध्ये शंटिंग सुरू असताना उज्जयनी ...
अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग?
नवी दिल्ली : देशभरातील गल्लीबोळांमध्ये आणि रस्त्यांवर वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून लहान मुले, वृद्ध तसेच सामान्य नागरिकांवर ...
महायुतीमधील जागावाटपावरही चर्चा?
विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळाव्यात आणि पक्षांतर्गत चाललेल्या नाराजीनाट्याला पूर्णविराम मिळावा, या दृष्टीने तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीनंतर आता महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र काय ठरणार आणि अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला भाजप हिरवा कंदील दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




