
काश्मीर : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस मधील आगीची घटना ताजी असतानाच आता काश्मीर मध्ये सुद्धा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय ठरली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गाव जळून खाक झाले आहेत. सुदैवाने इथे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

मुंबई : टोरेस घोटाळा प्रकरणाची तपासाची सूत्र आता ईडीच्या हाती सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरूवात केली ...
काश्मीरच्या किश्तवाड येथे सध्या कडाक्याच्या थंडीमुळे तापमान थंड झालेले आहे. या परिसरात सातत्याने हिमवृष्टी होत आहे. मात्र एवढ्या थंडीतही ही भीषण आग लागली आहे. किश्तवाडमधील दुर्गम भागात वसलेल्या बाडवन येथील मार्गी आणि मालवन गावांमध्ये ही आग लागली आहे. या भीषण वणव्यात अनेक घरं जळून खाक झाली आहेत. तर शेकडो लोकांना या आगीचा फटका बसला आहे. लोकांनी स्थानिक पातळीवर बचावकार्य करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.स्थानिकांकडून या आगिवर नियंत्रण ठेवण्याचं काम अजूनही सुरूच आहे. असे असले तरी या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्टच आहे.