Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीसमृध्दी महामार्गालगत एग्रो हब उभारणार

समृध्दी महामार्गालगत एग्रो हब उभारणार

मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गालगत मॅग्नेट प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक अॅग्रो हब उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पणन विभागाला दिले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्यातच आवश्यक ते नियोजन करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठीच जास्त मागणी आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी अशी सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या पणन विभागाला दिली आहे.

La Nino : प्रशांत महासागरात ‘ला निनो’ सक्रिय!

मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या पणन विभागाच्या मागील १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पणन विभागाला दिले.कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे. यासाठी राज्याच्या चारही विभागात आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे अॅग्रो लॉजिस्टक हब उभारण्यात यावेत. या हबसाठी प्रस्ताव सादर करा; असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पणन विभागाला दिले आहेत.

Mumbai Accident : मुंबईत १२ व्या मजल्यावरून खाली कोसळून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महा बाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे. कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. राज्यातील १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते पंचवीस कोटी असे उपावर्गिकरण करणार. छ. संभाजी नगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ऍग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही देवरा यांनी यावेळी सांगितले. बैठकीस पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे – बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -